जीवनात खूप करण्याजोगं असतं
जीवनात खूप करण्याजोगं असतं
1 min
307
संकटाला कधी टाळायच नसतं, त्याला सामोरी जायच असतं
कुणी थांबवलं तरी थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम रेटायचं असतं
अपयशानं कधी खाचायचं नसतं, जिद्दीचं बळ वाढवायचं असतं
नाराज मुळी व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं
पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे अन् पुढेच जायचं असतं
जीवनात खूप करण्याजोगं असतं, आपलं फ़क्त तिकडे लक्ष नसतं
