STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

झाले रस्ते सुनसान

झाले रस्ते सुनसान

1 min
11.5K

जिथे नेहमी गर्दी असते तूफान

झाले तिथे रस्ते कसे सुनसान ।


झुंबड माणसांची होती बाजारात

आज पोचले किती रुग्णालयात ।


जीवनाचीच झाली आता भीती 

दिवस एकांतात काढायचे किती ।


थांबली चाकं सारी जगभरात

आनंद, कुठे दुःख आहे घरात ।


मोकळे हे हात, नाहीत कामात

भाकरी तर हवी ना या पोटात ।


मनाचा झाला कोंडमारा हृदयात

निघायचे मजला मोकळ्या हवेत ।


करतो देवा प्रार्थना तुझी आता

जाईल कोरोना आशा ही मनात ।


Rate this content
Log in