झाडाची शिकवण
झाडाची शिकवण
1 min
217
निसर्गाची किमया
आज मी पाहिली
आणि माणूस म्हणून
मलाच माझी लाज वाटली
बहरलेला आम्रवृक्ष
क्षणात त्याने तोडला
फळाचा आणि कोवळ्या पालवीचा
विचारच नाही केला
स्वार्थासाठी तोडून
अर्ध्यावरच तसाच सोडून दिला
सजीव झाड निर्जीव होऊन
तसाच खितपत पडला
अर्धवट उन्मळून पडलेल्या झाडाने
कमालच केली
लागलेल्या फळातून
रोपटं होऊन जिद्द नाही सोडली
कुठूनही कसंही बहरावं
ते निसर्गाकडून शिकावं
आता तरी आपल्या चुका सुधारून
माणसाने माणसासारखं वागावं
