जग गोल....
जग गोल....
1 min
233
आई माझ्या जीवनाचा तू सागर
भरली तुझ्या मायेनं प्रेमाची घागर
तुझ्या अंतःकरणात माझं चित्र खोल.....
आई तूझं प्रेम माझ्यासाठी मोती
तुझ्या मायेसाठी सोडली नातीगोती
आई तुझ्याचं प्रेमातं हे सारं जग गोल....
आई तू वृक्ष मी आहे तूझं पान
देवाआधी करतो आई तुझा सन्मान
देव विसरलो माझ्यासाठी तुचं अनमोल....
