जग चालतं
जग चालतं
1 min
190
जसं जग चालतं
तसं चालावं लागतं
गप्प बसून गुपित
साऱ्यांच खोलावं वाटतं .....
नशिबाच दार आपल्या
हातानं उघडावं लागतं......
मिळतात खूप बहुरुपी
आपला मुखवटा लपवी
बईमान लोकांच जगात
हो किती नाव आहे गाजतं.....
गोड बोलून लळा लावणारे
मिठी मारून गळा कापणारे
अशा माझ्या प्रिय मित्रांशी
माझ मन आज वाईट वागतं.....
दुःख माझं मी लिहून थकलो
देवाला सांग मी चुकलो
जग जिंकण्याच स्वप्नं माझं
डोळ्यापुढे आहे आज जागतं.....
