STORYMIRROR

Hemant Joshi

Others

3  

Hemant Joshi

Others

हे वसुंधरे (मराठी कविता)

हे वसुंधरे (मराठी कविता)

1 min
159

हे वसुंधरे,

अमर्याद तुझं अस्तित्व,

अवघ्या चराचरावर तुझं स्वामित्व,

तू मैत्रीण सुर्याची, तूं निर्माती विश्वाची आणि स्वामिनी विज्ञानाची,

तुझ्या रक्षणाची गरज आम्हाला पटू दे,

तुला आपलं म्हणण्यासाठी सारे झटू देत..

संगणक युगाची तूं साक्षी ,तूच आम्हाला सदैव रक्षीतेस,

तुला पोखरणा-या ,छळणा-या,तोडणा-या हीन वृत्तींचे कली आता वाढलेत,

तुला पुन्हा सुन्दर हिरवीगार ठेवण्यासाठी सांग माते,

मानवाने काय आणि किती उपाय शोधून काढले आहेत?

पाणी हवा डोंगर माती झाडे वेली नद्या यांचा

अनिर्बंध गैरवापर करणाऱ्याचा धिक्कार असो ,

तुझी जाणीव ठेवणाऱ्या जाणकाराला नमस्कार असो ,

हे पृथ्वीदेवी तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे,

तुझ्यासमोर आम्ही सारे नतमस्तक आहोत ,

तुझे हजारो विशाल हात सद्गवृत्तींच्या मस्तकावर राहोत

तुझ्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी तूच आम्हाला

सद्विवेकबुद्धी आणि सद्दवृती दे

मग सारी हरित क्रांती पुन्हा गाऊ लागेलच !!

पृथ्वी माते तुझा जय जय कार असो

पृथ्वी माते तुझा जय जय कार असो


साहित्याला गुण द्या
लॉग इन