STORYMIRROR

Chunouti Koli

Others

4  

Chunouti Koli

Others

हे तिचे मागणे

हे तिचे मागणे

1 min
307

त्या छोट्याशा गर्भातल्या कळीला न मारता 

तिला मुक्त श्वास घेऊ द्या हे तिचे तिचे मागणे....

 

स्वतःला विसरून कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या तिला थोडासा सन्मान द्यावा हे तिचे मागणे...

 

काही स्वप्ने आहेत तिची

ती पूर्ण करु द्या हे तिचे मागणे...

 

समजून घेणे तिला थोडेसे अवघड आहे

तरीसुद्धा थोडेसे समजून घ्यावे तिला

हे तिचे मागणे.....

  

तिचे काही विचार आहेत

तिला ते मांडू द्या हे तिचे मागणे...

 

तिचेही मन कधीतरी

विचारात घ्या हे तिचे मागणे....


छोेटेसे विश्व आहे तिचे तुमच्यापासून तुमच्यात संपते,

तिच्या विश्वात येऊन तिचे होऊन जा हे तिचे मागणे....


थोडेसे प्रेम करा तिच्यावर 

हे तिचे मागणे...

 

तुम्ही आनंदी आणि

हसत राहावे हे तिचे मागणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन