ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
340
जिथे पहाट होते
भजन, किर्तनाने
ग्रामीण भारत तो
सांगतो आदर्शाने...
जाती पाती सोडून
राहे गावकरी प्रेमाने
ग्रामीण भारत तो
सांगतो आदर्शाने....
जिथे स्वच्छता मोहीम
केली जाते अभिमानाने
ग्रामीण भारत तो
सांगतो आदर्शाने....
शेतकरी जगतो आहे
सुखाने, स्वाभिमानाने
ग्रामीण भारत तो
सांगतो आदर्शाने....
जगाने हेवा घ्यावा
जगतो गाव सन्मानाने
ग्रामीण भारत तो
सांगतो आदर्शाने...
