STORYMIRROR

Sindhu Salekar

Others

4  

Sindhu Salekar

Others

🌻गीत गाते सुरात 🌻

🌻गीत गाते सुरात 🌻

1 min
163

गर्द हिरव्या रानात वाहती वेड्या पायवाटा 

वृक्षवल्लरी बहरल्या ,निर्झराच्या संथ काठा 

खळाळत्या निर्झरा संगे गीत गाते सुरात ॥१॥


तांबूस केशरी क्षितीजावर ,लाल झाली गिरी शिखरे 

वेध लागले घरट्याचे ,धुंद शिणली पाखरे 

वेड्या पाखरांच्या संगे गीत गाते सुरात ॥२॥


रंग गंधीत पुष्पे,आवेशाने बाहूत घेती 

रंग गंधाच्या संगतीने ,दिशा शिंपल्यात जाती 

चिमुकल्या कळ्या संगे गीत गाते सुरात ॥३॥


दाट वेळूच्या रानात ,वारा सांगतो कानात 

पावा वाजतो सुरात ,मोर नाचतो मनात 

पाचूच्या मोरणी संगे गीत गाते सुरात ॥4॥


काळ आता तेथे नाही ,सारे काळ एक होती 

गुढ काळाच्या प्रवाही ,पाऊले जमिनीशी राहती 

अंधारल्या काळोखा संगे गीत गाते सुरात ॥५॥


Rate this content
Log in