STORYMIRROR

Mohit Jagne

Others

4  

Mohit Jagne

Others

एक जटिल प्रेम

एक जटिल प्रेम

1 min
451

भेटत...

ती पण नाही,


भेटत...

मी पण नाही...


निभवणे तिला जमत नाही,

आशेवर ठेवण मला पटत नाही.


फसवत

ती पण नाही,


फसवत

मी पण नाही...


तिला रुसण्याचे दु:ख आहे,

मला एकटेपणाची भीती आहे...


समजत...

ती पण नाही,


रागवत...

मी पण नाही...


कुठल्यातरी वाटेवर

भेट होत असते नेहमी


बघत...

ती पण नाही,


थांबत...

मी पण नाही...


जेव्हा पण बघतो तिला,

ठरवतो काहीतरी

बोलेन तिच्याशी...


ऐकत...

ती पण नाही,


सांगत...

मी पण नाही...


पण एक गोष्ट मात्र खरी आहे,

प्रेम माझे आजही आहे तिच्यावर


नाकारत...

ती पण नाही,


सांगत...

मी पण नाही...


कारण आपल‌ं प्रेम

अजूनही पूर्ण पण नाही,

आणि अर्धंपण नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन