STORYMIRROR

Vijay bhadane

Others

3  

Vijay bhadane

Others

दिव्यव्रत कविता

दिव्यव्रत कविता

1 min
249

पर्यावरण रक्षणाच्या घेउनी

दिव्य व्रता !

प्रदूषणमुक्त करू सुंदर धरती माता ---!

विज्ञानाचे नित्यनवे शोध अति

प्रगती विकासाला आ ली गती

प्रदूषणाची होय अटळ निर्मिती

सृष्टीच्या जीवावरी प्रदूषण

उठता---!!

अशुद्ध पाणी दूषित कचरा

विषारी वायूंचा घातक भवरा

वणवैभवाचा अस्तंगत हरित चेहरा 

निसर्ग संपदेचा विनाश होता---!!!

ओझोनचा थर 

 पर्यावरणाचा प्राण

दाट आवरणाचे घटते 

चिंताजनक प्रमाण

भूकंप वादळ अवर्षण

अतिवृष्टी उष्णतेची

वाढती कमान

ग्लोबल वार्मिंगचे संकट

उभे ठाकता---!!

झाडे लावू झाडे वाढवू

परिसर वातावरण स्वच्छ

राखू स्वच्छ ठेवू

आरोग्य संपन्न समाज घडवू

निसर्गदेवतेशी राखुनी सख्य प्रामाणिकता ---!!!

पर्यावरण रक्षणाच्या घेउनी

दिव्य व्रता

प्रदूषणमुक्त करू आपली

सुंदर अनमोल धरतीमाता!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन