दिवाळीचा किती ग हा थाट ?
दिवाळीचा किती ग हा थाट ?
1 min
395
दिवाळीच्या निमित्ताने लावले
गेले कंदील खास
प्रकाशाच्या उजेडाने
शोभून दिसे घर हमखास
अंगणार दिसे सडा,रांगोळी गं बाई
लाडू चकली करंजी बनवते का गं आई ?
नवनवीन कपड्यांनी सजले सारेजण
फटाक्याच्या प्रकाशाने खुलले लहानग्यांचे मन
लक्ष्मीच्या आगमनाने पुजले सारे धन
बहिण भावाच्या नात्याने उजळले हे क्षण
चंदन उटण्यांच्या सुगंधाने आली ती पहाट
तरीही जाहीरातीत बघते मी मोती साबणाची वाट
दिवाळीच्या सणाला
मामांकडे घेतले कपडे नवेनवे
अंगण खुलून दिसण्यासाठी
लावले किती सारे असंख्य ते दिवे
आईने सजवलं
सूंदर फराळाचं ताट
पण काम आवरून वाटत
दिवाळीचा किती गं हा मोठा थाट ?
शुभेच्छांच्या वर्षावासाठी किती सारे फोन मेसेज हे आले
आनंदाच्या वातावरणाने मन हे प्रसन्न झाले
