STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

देवा का रे हा दुरावा

देवा का रे हा दुरावा

1 min
176

देवा का रे हा असा

तुझ्या माझ्यात दुरावा ।

भक्तीला तुझ्या का

हवा रे तुज पुरावा ।


नित्य करितो भक्त

भक्ती तुझीच देवा ।

नाही कुठली अपेक्षा

हवा भक्तीचा ठेवा ।


चरणी तुझ्या असू दे

भाव भक्तीचा माझ्या ।

दर्शनाची मनात आशा

येईल पंढरीत तुझ्या ।


दुमदुमू दे परत पंढरी

भक्त भुकेला तुझा हरी ।

नामस्मरण तुझेच चाले

डोळे तुझ्या वाटेवरी ।


भेट तुझी माझी घडू दे

नको करू रे दुरावा ।

लागली ओढ दर्शनाची

नाही त्याला पुरावा ।


घोष विठ्ठलाचा कानी

निघे ओठातून ध्वनी ।

जय हरी विठ्ठल विठ्ठल 

जप अखंड चाले मनी ।


Rate this content
Log in