Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Seema Aloney

Others

4.0  

Seema Aloney

Others

डायरी

डायरी

1 min
192


जन्मासोबत घेऊन येतो 

 आपण आपल्या आयुष्याची डायरी 

जिची पानं असतात 

  अगदी नवी आणि कोरी ॥

 उगवत्या दिवसाबरोबर 

   रोज एक नवीन पान उघड असतं 

दिवसभराच्या कामाचं

   त्यात सार नमुद असतं ॥

दिवसामागून दिवस 

   जातात सरत सरत

डायरीतल एकएक पान 

   जात भरत भरत ॥

 कालच पान वाचून 

   उद्याच नियोजन करू शकतो 

पण काय लिहिलं जाणार  

  याचा आपल्याला थांगपत्ताही नसतो ॥

डायरी आपली असते 

   पानही आपलीच असतात 

पण त्यात काय लिहावं 

  हेही नसत आपल्या हातात ॥

डायरीतीला कालची पानं 

  नशिबात आहे एवढीच वाचन

पण उद्याच्या पानांवर 

  अधिकार आपला काहीच नसतो ॥

आता या क्षणापर्यंत 

  तेवढंच ते आपल असतं 

नंतरच्या क्षणात मात्र

 गुपितच भरलं असतं ॥

किती पानांची डायरी 

   याची कल्पनाही नसते

कधी अचानक संपेल 

   ते तर अकल्पित असतं ॥

डायरीतील पहिले पान  

  तेवढंच ते आपल असतं 

डायरीतील शेवटचं पान 

  ते कधी आणि कुठलं ॥


Rate this content
Log in