STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

Date: 01-Mar-2020 Subject: एक

Date: 01-Mar-2020 Subject: एक

1 min
198

खूप सहन केलं तिनं गरिबीच दुःख 

तिच्या पदरी घाल तू श्रीमंतीच सुख 

आईच्या हिमतीला तू नमस्कार कर......


डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे 

उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे 

तिच्या कष्टावर देवा तू चमत्कार कर......


हात जोडून ती कधी का मागतं नाही 

तिच्या आशा खूप आहेत सांगत नाही 

आईच्या मायेवर तू तुझेच

एक उपकार कर.....


माझ्या आईची तू स्वप्नं पूर्ण कर

देवा तू माझ्यावर एक उपकार कर.....


खूप सहन केलं तिनं गरिबीच दुःख 

तिच्या पदरी घाल तू श्रीमंतीच सुख 

आईच्या हिंमतीला तू नमस्कार कर......


डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे 

उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे 

तिच्या कष्टावर देवा तू चमत्कार कर......


हात जोडून ती कधी का मागतं नाही 

तिच्या आशा खूप आहेत सांगत नाही 

आईच्या मायेवर तू तुझेच संस्कार कर....


तिच्या पोटी संगमने जन्म आहे घेतला 

माझ्या यशात तिनं तिचा जीव ओतला 

आईच्या स्वप्नांचा देवा तू साक्षात्कार कर....



Rate this content
Log in