चुकलो
चुकलो
1 min
259
माझ्या गोड आठवणींना मुकलो
कळतं नाही मी कसा कुठे चुकलो....
आज चोहीकडे गाजतय माझं नाव
आठवणींत राहील आहे माझं गाव
आज एकटा मी दुराव्यापूढे वाकलो
करतात लोक आज माझ्यावर टीका
मी केलेल्या कामात शोधतात चुका
काही मिळवण्याच्या शर्यतीत थकलो....
हरवायच नाही हो मला कधी कुणाला
ईमानदारीने जगतो सांगू किती जणाला
अपयश मिळाल यश ना मिळवू शकलो.....
राग काढा हो तुम्ही सारे माझ्यावर सगळा
तुमचाच थोडा वेडा जगावेगळा
काय होईल माझं मी आज दुःखापूढे झूकलो......
