" चहा नाही कोण म्हणेल "
" चहा नाही कोण म्हणेल "
1 min
238
बेड टी हवा सकाळी सकाळी
दिवसच असा सुरू होत नाही ।
केव्हाही आले जर पाहुणे घरी
चहा घेल्याशिवाय जाणार नाही ।
थकवा आला डोके दुखते जर
चहा शिवाय होते कुठे काही ।
पेय झाले हे आवडीचे सगळ्यांचे
गरीब असो श्रीमंत, हवा चहा शाही ।
दिवसातून कितीही वेळा द्या
म्हणतो चहाला कोण नाही नाही ।
