भाव
भाव
1 min
147
तिखट मिरची तुझे
आहेत तिखट बोल
मनात तुझ्या काळ
करू नको तू झोल
किती वाढला आहे
तुझ्या रुबाबाचा भाव...!!१!!
माझ्या सारखे तुला
रोज भेटतात किती
साधा भोळा आहे
कळेना तुझी नीती
लबाड बाता तुझ्या
मी करेना घूमजाव...!!२!!
माझ्या मागे का तू
अशी लागली आहे
अगं माझ्यासाठीच
मी रात्र जागली आहे
इतका बरा नाही राग
मी देईना तुला वाव...!!३!!
वेळ नाही माझ्याकडे
तू करू नकोस वाद
कधी करत नाही
तुझ्या सारखीचा नाद
किती लावायची आहे
तुला आग गावात लाव...!!४!!
