भाज्या
भाज्या
1 min
421
शेपू हिरवी
तब्येत उत्तम
करते भक्कम
बाळा भरवी
मेथी पराठे
बने सवडीने
खाती आवडीने
आनंद वाटे
गवार धुरी
वांगी भरलेली
ओवा घातलेली
मेथीची पुरी
कोबी पानांची
प्रथिने अंतरी
पर्ण रूप जरी
शोभा ताटाची
कोबी कबाब
घरी बनवते
तळून काढते
ते लाजवाब
ताट भरुन
पूर्णान्न जेवण
उदर भरण
तृप्त करुन.
