बाप
बाप
1 min
187
सारी कर्तव्य पाठीवर पेलत
बाप ओझ्याने वाकला
स्वतःसाठी जगलाच नाही
नाही कधी कुणापुढे झुकला...
परिस्थितीने दिले चटके
विचाराने डोके झाले बधीर
हताश झालेल्या कुटुंबाचा
टिकवून ठेवतो बाबा धीर......
त्सुनामी लाटेप्रमाणे आली
संकटे वेगाने अंगावर
कुटुंबाला घट्ट धरून बाहूत
खंबीरपणे उभा जागेवर......
उन्हा तान्हात कष्ट करून
थकल्या पावली घरी आलेला
वास त्याच्या घामाचा सांगतो
तो जागतो त्याच्या कर्तव्याला......
कुटुंब प्रमुख म्हणून त्याला
चालावे लागते निखाऱ्यावर
साऱ्यांच्या इच्छा पूर्ण करताना
कसरत चालते तारेवर......
अंत:करण बापाचे भोळ्या
आई एवढेच नाजूक असते
कर्तव्याच्या आड लपलेले
म्हणूनच ते घरात नसते......
