STORYMIRROR

Ananata Salunkhe

Others

3  

Ananata Salunkhe

Others

बाप

बाप

1 min
173

बाप शेतात राबत असतो

मुलगा शाळेत शिक्षण घेत असतो

उन्हाचे चटके बसत असतात

त्याच्या पाय जोडे नसतात

पाय अनवाणी असतात!!१


कष्ट करण्याची जिद्द असते

मुलाला शिक्षण देण्याची प्रेरणा असते

दिवसभर उपाशी राही

मुलाला भरपूर जेवन देई

त्याचे मन तृप्त होईल!!२



ध्यास होता शिक्षणाचा

मुलाला शिक्षण देण्याचा

जीवन समृद्ध करण्याचा

चतकोर भाकरी खाई

विचार चक्र चालूच राही!!३



मुलाचे स्वप्न पाहत राही

रक्ताचे पाणी केले

कष्टाची भाकरी फुलली

आनंदाला तोटा नाही!!४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Ananata Salunkhe

बाप

बाप

1 min वाचा