STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

बांधू नकोस कयास

बांधू नकोस कयास

1 min
357

कशाला तू बांधत आहे

मनात असले कयास ।

विचारांनीच या अशा

गेला रे तू लयास ।

नेहमी असतोस चिंतेत

होतात झोपेतही भास ।

विचार कर थोडा

कधी थांबला जर श्वास ।

दे ना सोडून सारे

बरा नाहीच हा हव्यास ।

उठ जरा जागा हो

ठेव मनात विश्वास ।

विजय तुझा नक्की होईल

वाटेल भूषण आम्हास ।


Rate this content
Log in