STORYMIRROR

Dhanashree Muchandi

Children Stories Fantasy

3  

Dhanashree Muchandi

Children Stories Fantasy

बाबा

बाबा

1 min
167

दिल्या घरी सुखी रहा ,म्हणत बाबा खूप रडला होता

कुणासमोर न झुकणारा बाबा..व्याहींच्या पाया पडला होता


दिसला वरून कठोर तरी लेकीसाठी रडला होता

अश्रू लपवून डोळ्यात, वेदनांशी आपुल्या लढला होता़


शांत पणे कोपर्‍यात एकाकी माझ्याकडे बघत होता

कंठ दाटून आला होता पण खोटे खोटे हासत होता...


दिल्या घरी सुखी रहा म्हणत , बाबा खूप रडला होता

कुणासमोर न झुकणारा बाबा..व्याहींच्या पाया पडला होता


हळूच जुन्या आठवणीं मनोमनी कुरवाळत होता

कसे होईल लेकीचे आता ,प्रश्न जिव्हाळी रुतला होता


हलकेच बघून माझ्याकडे स्मितहास्य करीत होता

मनातल्या वेदना झाकायचा आटोकाट प्रयत्न करत होता


दिल्या घरी सुखी रहा म्हणत , बाबा खूप रडला होता

कुणासमोर न झुकणारा बाबा..व्याहींच्या पाया पडला होता


बाबाच्या नावाची जागा, आता दुसरा कुणी घेणार होता

दूर करून बाबा पासून ,दुसर्‍याच जागी नेणार होता


घट्ट मिठी मारून लेकीला, ढसाढसा रडला होता

कुणासमोर न झुकणारा बाबा व्याहींच्या पाया पडला होता


Rate this content
Log in

More marathi poem from Dhanashree Muchandi