अंतरी
अंतरी
1 min
212
उपकार करी तो माझ्यावरी
संसाराचं ओझं घेऊन उभा विटेवरी....
जगाचा दूर करूनी सारा मळ
श्रद्धेचे खुलविले जगात कमळ
संतांनी बसविले अभंगाच्या अंतरी....
सूर्याचं तेज दिलं सारं मनुष्याला
सगळ्यात सुंदर बनविले पाषाणाला
सारं सुख मिळतं टेकविला माथा तरी....
विचार करू नको तू अंधाराचा
तोच मालक आहे तुझ्या संसाराचा
पावन होईल तो तू उपवास केला जरी...
जा स्नान कर चंद्रभागेत
तुझं नशीब राहिलं श्रद्धेच्या जागेत
येईल सोन्यासारखी सुखाची दारी परी....
