आठवणीतला उन्हाळा
आठवणीतला उन्हाळा

1 min

11.9K
उन्हाळा म्हणजे
मामाचं गाव,
आजीकडे खाऊसाठी धाव
उन्हाळा म्हणजे
लोणच्याच्या फोडणीचा वास
खेळत उशिरा झोपायचा ध्यास
उन्हाळा म्हणजे
गच्चीवरच्या गार वाऱ्यातली झोप
तळलेल्या पापड कुरड्यांची तोफ
उन्हाळा म्हणजे पिवळं ऊन
जुन्या सिनेमांची एकच धून
काय आठवतो का मग
आठवणीतला उन्हाळा!