आशेवर ठेवील....
आशेवर ठेवील....
1 min
255
हे ही माझं ते ही माझं
समज की काही ना तुझं
जितकं मिळालं नशीब तुझं
का उगीच जीवन आशेवर ठेवील...
तुझ्या हातात काहीच ना उरलं
मग रडत बसशील तू जे गमाविलं...
बरं-वाईट रे काही नसतं
दु:खातचं खरं सुख असतं
कर जे तू आहे ठरविलं...
धन दौलत हेच मोठं दु:ख
मिळे मनाला शांती हेच सुख
शोध क्षणात सुख जे तू हरविलं...
