STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

दिवास्वप्न

दिवास्वप्न

1 min
211

लाडिकपणे नेहमीपेक्षा प्रसन्न मुद्रेनं तिने हळूच दार उघडले. तिला वाटलं तोच आला असावा ज्याची ती आतुरतेने वाट पहात होती.

पण समोर प्रियकराऐवजी पतीला पाहताच आपला कडवट चेहरा लपवत व केविलवाणी हसत ती त्याला म्हणाली,

"मला तुम्ही इतक्यात याल असं वाटलंच नव्हतं!"

तो म्हणाला," कारण मी आज दिवास्वप्न पहात होतो माझ्याऐवजी दुसराच कुणी दरोडेखोर येईल व तुला पळवून नेईल ज्याची मला आतापर्यंत प्रतिक्षा आहे!"

काय? म्हणत ती एकदमच दचकल्याचं नाटक करत त्याला बिलगली.


Rate this content
Log in