ओंजळ आठवणींची
ओंजळ आठवणींची
ते दिवस होते सोनेरी
सुंदर आणि मखमली
सुसह्य होते जगणे
वाटे आपलीच वाट भली
नव्हता सुखाचा
अन आनंदाचा भागाकार
जीवन जणू एक सरळ रेषा
नव्हती कोणतीच क्लेशा
नसे रोजच्या प्रश्नांचा धाक
नव्हती पैसे कमवण्याची ताकीद
वेगळे होते स्वप्नांचे आकाश
कधीच केले नाही कोणतेच भाकीत
मन जेथेसंगे तेथेजायचे
कुतूहलाने नवीन जग अनुभवायचे
हात लावायचा रंगीत फुलांना
मनीच झुलू द्याचे मनातील झुल्यांना
दुःखाची चाहूलही नव्हती
असेच होते सुंदर माझे बालपण
त्रास, यातना, फिरकल्याचं नाही
नव्हते कधीच बंधनाचे कुंपण
हि घडी अशीच राहावी
मागणी होती त्या बालमैफिलींची
जगणं अवघड आहे आता, आता,
राहते, रितीच ओंजळ आठवणींची
