नाव:- अशोक शिवराम वीर शिक्षण:- डी. एड्., ए. टी. डी., जी. डी. आर्ट. पेशाने शिक्षक असल्याने वाचनाची आवड. शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता आणि तो आजही जोपासला आहे. वेळ मिळेल तेव्हा सद्य स्थितीवर कविता लिहिणे आवडते. कवितांमधून समाज प्रबोधन करणे, समाजाला जागे करणे गरजेचे वाटते.
Share with friendsस्वारी बोलल्याने चूक दुरुस्त होत नाही, त्यासाठी चूक होऊच नये म्हणून काळजी घ्यायला लागते. तसेच गंगेत डुबकी मारल्याने पाप धुतले जात नाही, त्यासाठी पुण्यकर्म करावे लागते.
जीवन म्हणजे काय तर झाडावरची पालवी आज कोवळी तर उद्या तीच पिवळी. आज बहरलेली तर उद्या गळालेली, किमया निसर्गाची अशीच ही ठरलेली. अशोक वीर
निवृत्ती म्हणजे काय तर जीवनात सुख भोगण्याची केलेली सोय, आणि नियमितच्या कामातून घेतलेली विश्रांती होय. अशोक वीर