अंतिम सत्य.. मागे उरावे बाकी काही हा अट्टाहास उगाच दिसतो.. अंतिम सत्य केवळ शून्य जीवनाचा हाच नियम असतो..!! --सुनिल पवार...✍🏽
II भक्तीची शक्ति II भक्तीच्या ह्या शक्तीला नसते कोणतीच तोड.. मात्र अवडंबर नसावे असावी निर्मोही जोड..!! --सुनील पवार..✍️
स्वप्न.. का लपला आज चंद्र कृष्णमेघांच्या मागे..? मिटलेल्या नयनांतून स्वप्न अजूनही जागे..!! --सुनिल पवार..✍️
निरपेक्ष कर्म.. अपेक्षेचं ओझं दुःखास कारण ठरते निरपेक्ष कर्म अनपेक्षित लाभ देते..!! --सुनिल पवार..✍️
या धकाधकीच्या जीवनात मनःशांती दुर्मिळ झाली.. श्रद्धेचा अतिरेक झाला अन् माणसाची मनं दगड झाली..!! --सुनील पवार..✍️
|| जीवनानुभव || =========== अजब भासतो जीवनानुभव हा खेळ रंगतो नित्य अभिनव किती जिंकले डाव आजवर अंती सरणावरती जळते शव..!! ***सुनिल पवार...✍