Dinesh Kamble
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

105
Posts
215
Followers
1
Following

Teacher

Share with friends

काळजाची वात करतो अडचणींवर मात करतो तत्ववेत्ता तोच आहे जो उद्याची बात करतो दिनेश✍🏻

जो व्यक्ती दुःख, दैन्य, कष्ट, हाल, अपेष्टांचा सामना करत, भूतकाळाच्या छाताडावरा अविरत मेहनतीचा मारा करून, वर्तमानाच्या मस्तकावर संयमरूपी पाय घट्ट रोवून उभा राहण्याचे सामर्थ्य ठेवतो, त्याला भविष्यातील कुठल्याच संकटाचे भय नसते 231) दिनेशच्या डायरीतू✍🏻

जीवनाच्या वाटेत अनेक किरकोळ गोष्टीं तुमची अडवणूक करतील त्यावेळी त्या प्रत्येक किरकोळ गोष्टींचा बाऊ करून स्वतःच्या अंगी असणारी बलस्थाने कमकुवत करून घेण्याऐवजी सदर किरकोळ बाबींची योग्य ती नोंद घेत पुढचा प्रवासाची आखणी करावी 227) दिनेशच्या डायरीतून✍🏻

जी माणसे तुमच्या शालिनपणाला तुमचा नेभळटपणा समजून तुमच्यावर सत्ता गाजवू पाहतात अशांना योग्य वेळी तुमचा विद्रोह दाखवून द्यावा. 228) दिनेशच्या डायरीतून

ऋतू बदलानुसार तुमच्या अंगावरचा पोषाख जरूर बदला, ती काळाची गरज आहे मात्र तुमच्या अंगातील चांगुलपणा तुमच्या पदानुसार बदलू देऊ नका. लोकांनी तुमची ओळख तुमच्या अंगावरील कापडावरून नव्हे अंगातील गुणांवरून/चांगुलपणावरून ठरवावी. 230) दिनेशच्या डायरीतून.✍🏻

जीवन म्हणजे सफर आणि नातेवाईक म्हणजे सहप्रवासी येथे सर्वांचे प्रवास टप्पे ठरलेले असून कोण कधी केव्हा उतरेल याचा अंदाज कधीच कुणाला लावता येत नसतो.

जीवन म्हणजे सफर आणि नातेवाईक म्हणजे सहप्रवासी येथे सर्वांचे प्रवास टप्पे ठरलेले असून कोण कधी केव्हा उतरेल याचा अंदाज कधीच कुणाला लावता येत नसतो.

काही माणसे आपला अज्ञानपणा स्वीकारण्यास असमर्थ असतात किंबहुना त्यांची तशी मानसिक तयारीच नसते म्हणुन शहाण्याने त्यांना शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडूच नये. ____________________ 129) दिनेशच्या डायरीतून✍🏻

Feed

Library

Write

Notification
Profile