गझल..गझल आणि गझल
Share with friends
ओढ देतोस तू पावसा सारखी पाहते वाट मी चातका सारखी! सांगतो बाप सांभाळुनी घ्या तिला लेक नाजूक माझी फुला सारखी! अनिता बोडके
ना मला भय ना भिती वाटत तुझी वादळा नाही मुळी धडगत तुझी एवढाही तू नकोना घाबरू जिंदगी नाही तुला मागत तुझी अनिता बोडके
ना भेदभाव कुठला ना जातपात राहो देशात बांधवाचे हातात हात राहो! स्वातंत्र्य भारताचे माझ्या अभंग आहे फडकत सदा तिरंगा सा-या जगात राहो! अनिता बोडके