कथा कविता लिहायला आवडतात वाचायला आवडतात नवनवीन पुस्तके रचना वाचायला आवडतात तुमच्यासाठी माझे नव नवीन साहित्य स्टोरी मिरर वर प्रसिद्ध होत आहे याचा वाचण्याचा आनंद नक्कीच घ्यावा यातच आमचा आनंद आहे वाचकांना वाचण्यासाठी आभाळभर शुभेच्छा
Share with friendsचारोळी पावसाच्या त्या डबक्यातून, पाझरते पाणी, इवल्या इवल्या जलचराचि, थकून भागून उडते दाणादाणी, श्री सुरेश. डी. पवार
मिठी तुझ्या कुशीत तुझ्याच उशीत जिवन गाणे गात होतो, आनंदाच्या लहरीमध्ये, राहून राहून सुखावत होतो, टेकले ओठांच्या पाकळ्या, जणू गगनात भिजलो, असाच श्वास स्वप्नात लाभो, उठून पाहतो तर, उशी अन मीच भेटलो. श्री सुरेश.डी.पवार. (कल्याण ठाणे)
*चारोळी* आला वसंत ऋतू, *पानगळ झाली,* विविधतेने नटले सजले, *कोवळी पाने फुले बहार आली.* *श्री सुरेश डी पवार* *कल्याण ठाणे*
चारोळी मोर पिसारा फुलवून नाचतो, रंगीबेरंगी पंख ठिपके दिसतात सुंदर सुंदर, श्रावणात उन्मळतात रंक. श्री सुरेश डी पवार
कन्या कन्या वाचवा कन्या जगवा, अंगणी जणू फुलबाग फुलवा, कन्या रत्न हा अनमोल हिरा, दारावर फुलहार झुलवा श्री सुरेश डी पवार
चारोळी थेंबा थेंबात आहे जगणे, पाण्याशिवाय कसे राहणे, पाणी हे प्राण आहे, पाणी वाचवावे पाणी जिरवणे. श्री सुरेश डी पवार