शब्द गुंजतात कानाभोवती कविता रेंगाळते मना वरती साद घालून भावनांना हळुवार ती उतरते पानावरती ©सरिता सावंत भोसले
मैत्रीचं नातं मनापासून मनापर्यंत हृदयापासून हृदयापर्यंत रुसण्यापासून हसण्यापर्यंत आसुपासून हसुपर्यंत माझ्यापासून तुझ्यापर्यंत ©सरिता सावंत भोसले
विसावं तुझ्या मिठीत ध्यास हाच मनी उमलावी स्पंदने प्रीतीची कोमल तुझ्या स्पर्शानी प्रवास करताना आयुष्याचा ही वाट इथंच थांबावी ©सरिता सावंत भोसले
तुझ्या माझ्या प्रीतीला शब्दांचे कोंदण कशाला अतूट या नात्याला वचन बंधात बांधू कशाला ©सरिता सावंत भोसले
तुला प्रपोज करण्यासाठी शब्दांची काय गरज नजरेस नजरेचे प्रेम कळत असताना ओठांनी नाकारायची काय मजल ©सरिता सावंत भोसले
काटेरी आयुष्यात माझा गुलाब तू प्रेमाच्या पाकळ्यांत बहरलेला माझा सुगंध तू पुस्तकातील आठवणींपासून सात जन्मांपर्यंत हृदयात मोहरणारा प्रेमरंग तू ©सरिता सावंत भोसले