Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#FreeIndia

SEE WINNERS

Share with friends

15 ऑगस्ट किंवा भारतीय स्वातंत्र्यदिन प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तन-मन-धनाचा त्याग केला, त्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा दिवस.

तथापि, स्वतंत्र देशात स्वातंत्र्याचा वास्तविक अर्थ कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो.

छेडछाड किंवा बलात्काराच्या भीतीमुळे एकटी मुलगी रात्री घराबाहेर जाऊ शकत नाही; बालकांना शाळेत पाठवण्याऐवजी बळजबरीने कुठेतरी काम करायला भाग पाडले जाते; ज्या देशाने राणी लक्ष्मीबाई, बचेंद्री पाल, सरोजिनी नायडू यांना जन्म दिला, तिथेच स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना होत असल्याचे आपण पाहतो; कित्येक मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहतात; लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला अजूनही प्राथमिक आरोग्य सुविधा मिळत नाहीत आणि अशी समस्यांची यादी आणखी कितीतरी पुढे जात राहते.


परिणामी, यातूनच, आपण खरोखर स्वतंत्र आहोत का, हा सवाल उपस्थित होतो.


स्वातंत्र्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वातंत्र्यदिन महत्त्वाचा दिवस आहेच आणि हा उत्सव अधिकाधीक अर्थपूर्ण कसा होईल, याबद्दल आपले मत व्यक्त करण्यासाठीच स्टोरी मिरर आपल्याला संधी देत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने #फ्रीइंडियाच्या उभारणीसाठी तुम्ही याद्वारे तुमचे मत मांडू शकता. चला तर मग एकत्र येऊन असा देश उभारु जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे स्वातंत्र्य लाभेल.


नियम :

  • स्वातंत्र्याचा सत्य अर्थ प्रतिपादन करणारी रचना असावी
  • रचना सादर करताना #फ्रीइंडिया हा हॅशटॅग वापरा
  • संपादकीय गुण आणि वाचकांना खिळवून ठेवण्याच्या आधारावर विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल
  • सहभागींनी आपली मूळ रचना सादर करावी. आपण कितीही रचना सादर करु शकता, त्याला मर्यादा नाही
  • शब्द मर्यादा नाही


साहित्य प्रकार :

  कथा

  कविता


भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य रचना सादर केली जाऊ शकते.


बक्षिसे :

प्रत्येक भाषेतील सर्वोत्कृष्ट 3 कथा आणि कवितालेखकांना स्टोरी मिरर शॉपची गोल्डन, सिल्व्हर आणि ब्राँझ सदस्यत्व मिळेल

प्रत्येक भाषेतील आणि साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट 10 रचनालेखकांना 100 रुपये किंमतीचे एसएम शॉप व्हाऊचर मिळेल

सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


रचना सादर करण्याचा कालावधी : 5 ऑगस्ट ते 31, 2020

निकाल : सप्टेंबर 2020


संपर्क :

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर : +91 9372458287



Trending content