STORYMIRROR

#Non Stop November Edition 3 - Intermediate

विजेते पाहा

मित्रांशी सामायिक करा

"एखादी जुनी कथा नव्या पद्धतीने पुन्हा सांगणे देखील स्वत: मध्ये नवी कथा असते."

- अॅनॉन

तुम्ही कधी कोणता चित्रपट पाहिला आहे का आणि विचार केला आहे का, की तुम्ही जर लेखक असता तर एखादे दृश्य कशा पद्धतीने लिहिले असते? कितेकदा असे ही झाले असेल जेव्हा केवळ एक दृश्य बदलण्यापेक्षा संपूर्ण कथानक च आपण बदलण्याचा विचार केला असेल.

जर तुमचे उत्तर होय असेल, तर तुमच्यात एक सर्जनशील प्रतिभा आहे जी तुमची इतिवृत्ते मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे! ओळखा पाहू?! तुमच्यामधल्या त्या लेखकाला बाहेर काढण्यात तुम्हाला मदत करण्याची आमच्याकडे उत्तम संधी आहे. स्टोरी मिरर नॉन-स्टॉप नोव्हेंबर लेखन स्पर्धा आवृती 3 येथे आहे!

नॉन-स्टॉप नोव्हेंबर लेखन आव्हान वेगळे आहे आणि यावेळी ते तीन भिन्न स्तरांसह बरेच मोठे आहे. तुम्ही एक, दोन किंवा तिन्ही स्तरांमध्ये सहभागी होऊ शकता. दोन किंवा अधिक स्तरांमध्ये भाग घेणे आणि आव्हान पूर्ण करणे तुम्हाला आमच्या मोठ्या बक्षीसासाठी पात्र बनवेल.

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - विनाअनुभवी - लिंक

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - इंटरमीडिएट / मध्यवर्ती/अनुभवी - लिंक

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - प्रभुत्व असणारा - लिंक

हे कसे कार्य करते ते येथे सांगितले आहे.

आम्ही तुम्हाला 30 दिवसांसाठी 30 चित्रपटांचे प्रॉम्प्ट देत आहोत. तुम्हाला दररोज एका चित्रपटाच्या प्रॉम्प्टवर लिहावे लागेल. तुम्हाला फक्त चित्रपटातील एखाद्या विशिष्ट दृश्याची तुमची आवृत्ती पाठवायची आहे किंवा तुम्ही आम्हाला संपूर्ण चित्रपटाची वेगळी आवृत्ती पाठवू शकता - तुमच्या दृष्टीकोनातून पाहिलेला चित्रपट. ती कोणतीही शैली, तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट असू शकते, जोपर्यंत ती त्या दिवसाच्या चित्रपटाभोवती आधारित आहे.

इंटरमीडिएट- स्तरासाठी सूचना -

भाषा: इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम.

वर्ग: कथा

नियम: 

१. सर्व विषयांवरील जमा केलेले सर्व साहित्य आणि संपादकांचे सरासरी मूल्यांकन यांच्या आधारे विजेत्यांची नावे ठरवले जातील.

२.तुम्हाला फक्त दिलेल्या प्रॉम्प्टवर/ कथानकावर लिहायचे आहे.

३.सहभाग घेतलेल्या सर्व जणांनी त्यांची मूळ सामग्री जमा करावी.

४. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर न करता ईमेलद्वारे किंवा हस्तप्रत किंवा सांक्षांकित प्रत म्हणून पाठविलेले कोणतेही साहित्य पात्र किंवा ग्राह्य ठरणार नाही.

५.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

६. स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रमाणपत्र विभागात उपलब्ध होईल.

बक्षिसे:

भाग घेतलेल्या सर्व साहित्यिकांना सहभाग घेतलेले प्रमाणपत्र मिळेल.

विजेत्यांना त्यांचे ई-बुक प्रकाशित करण्याची संधी मिळेल

सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र मिळेल.

मेगा बक्षीस

जर तुम्ही ७ पेक्षा जास्त संपादकांच्या सरासरी गुणांसह तीन स्तरांमधून कोणतेही २ स्तर पूर्ण केल्यास, स्टोरी मिरर कडून विजेता चषकासह विनामूल्य पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळेल.

साहित्य जमा करण्याचा कालावधी: १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१

निकाल: २० जानेवारी २०२२