Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sam Bhamare (स.निं भामरे)

Others

5.0  

Sam Bhamare (स.निं भामरे)

Others

तरुणाई

तरुणाई

1 min
667


देश आपला तो महान, झाले स्वप्न हे लहान,

माझ्या देशातले तरुण, आता झाले बेईमान


डोळा येते रे पाणी, आपला समाज बघून,

कुठे ठेवली रे माणुसकी, या लोकांनी गहाण


समाज बदलला आता, चालला संस्कृती विसरून,

आणि माझा तरुण बसला, दोन्ही हात ते जोडून


वाईट मार्ग तो अनुसरून, दिले व्यसनास निमंत्रण,

वडिलांच्या खांद्यावर, आले मुलांचे सरण


कोणी घेत नाही आता, आईबापाचे ऐकून,

आईबाप बसले आता, ते उशाला टेकून


माझ्या देशातले तरुण, तुम्ही जा रे बदलून,

या भारत देशाचे, तुम्ही ठेवा रे भान


जीव झाला तो वेडा, या समाजाच्या पायी,

काय होईल देशाचं, कुठे गेली तरुणाई


Rate this content
Log in

More marathi poem from Sam Bhamare (स.निं भामरे)