STORYMIRROR

durgataisong dheppe

Children Stories

3  

durgataisong dheppe

Children Stories

वास्तववादी

वास्तववादी

2 mins
203

स्मिता तिच्या तिन मुलांसोबत राहायची. घरची परिस्थिती तशी बेताची असल्यामुळे तिला बाहेर नोकरी करावी लागे. मुल लहान असतानाच त्यांचे वडील वारल्यानंतर घराची सगळी जबाबदारी तिच्यावर होती. घरची जबाबदारी सांभाळून ती नोकरी करत असे व आपल्या मुलांकडेही लक्ष देत असे.

आपल्या मुलांनी चांगले माणूस बनावेअसे तिला वाटे. ती नेहमी त्यांना काहीतरी चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत असे. एकदा तिच्या लक्षात आले कि, आपली तिनही मुल वेगवेगळ्या विचारांची आहेत. पण त्यांच्याकडे असणारा गुण त्यांना समजला तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात येईल. आणि म्हणून तिने आपल्या मोठ्या मुलाला बोलावले,व दुकानातून तेल आणायला सांगितले. त्याला एक बाँटल दिली व पैसे दिले. तो मुलगा तेल आणायला गेला. त्याने तेल विकत घेतले आणि परत येत असताना तो रस्त्यात एका दगडाला ठेचकाळून पडला. त्याच्या हातातली तेलाची बाँटलही पडली व तेल सांडले. तो रडत रडत आपल्या आईकडे आला व म्हणाला आई मी तेल आणले होते पण रस्त्यात मी ठेच लागून पडलो व तेल सांडले, व तो रडू लागला.स्मिता म्हणाली ठिक आहे.

      दुसऱ्या दिवशी स्मिताने तिच्या दुसऱ्या मुलाला पाठवले. त्यालाही एक बाँटल दिली पैसे दिले तेल आणायला सांगितले. त्या मुलानेही तेल विकत घेतले आणि परत येत असताना तो सुद्धा ठेच लागून पडला पण परत येत असताना तो रडला नाही आईकडे येऊन त्याची चुकी कबूल केली.व परत असे होणार नाही म्हणून सांगितले. स्मिता म्हणाली ठिक आहे.

             तिसरे दिवशी स्मिताने तिच्या तिसऱ्या नंबरच्या मुलाला तेल आणण्यासाठी पाठवले. त्यालाही एक बाँटल दिली पैसे दिले व तेल आणायला सांगितले. त्या मुलानेही तेल विकत घेतले आणि परत येत असताना तो सुद्धा ठेच लागून पडला. पण परत येताना तो रडलाही नाही आणि मनात काहितरी ठरवून परत आला. जेव्हा तो आईकडे गेला तेव्हा तिला म्हणाला आई मला माफ कर माझ्या कडून चुक झाली, तेल सांडले पण मी माझ्या चुकीची भरपाई नक्कीच करिन.

त्याचे उत्तर ऐकून स्मिताला खुप आनंद झाला. तिने आपल्या तिनही मुलांना जवळ बोलावले व सांगितले, कि मी तुमची ही परिक्षा घेतली होती. त्यात माझा पहिला मुलगा निराशावादी निघाला. एखाद संकट आल कि,डगमगुन जाणारा त्याने निर्भय व्हायला हवे. माझा दुसरा मुलगा आशावादी निघाला. तो संकटाचा सामना न डगमगता करू शकतो, पण संकटाला माघारी परतवून लावणे त्याने शिकले पाहिजे. आणि माझा धाकटा मुलगा वास्तववादी आहे. कोणत्याही संकटाला तो फक्त सामनाच करत नाही तर संकटाला परतवून लावण्याची मानसिकता त्याच्यात आहे.

तात्पर्य:- वास्तवाचा विचार करून जो काम करतो तोच यशस्वी होतो.


Rate this content
Log in

More marathi story from durgataisong dheppe