Gaurav Daware

Others

2.3  

Gaurav Daware

Others

सशक्त महिला

सशक्त महिला

1 min
111


     आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपल नाव आणि आपल कार्य मोठ करताय. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री असतें आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा पाठिंबा असतो पण वेळ बदलतो तशी परिस्थितीही बदलते आणि प्रत्येक परिस्थिती बदलायला काही क्षणही पुरेसे असतात. म्हणून आजची स्त्री या रणराणत्या आधुनिक जगात जगतांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच आपल योग्य तो मार्ग शोधू शकतात पण याचा अर्थ हा नाही की एखाद्या स्त्रीणे आपल यशाचा मार्ग शोधताना कोणाची मदत घ्यायलाच नको. कारण जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत अडचणी आहे आणि जोपर्यंत अडचणी आहे तोपर्यंत त्याला मदतीची गरज आहे.


पण ही सुद्धा गोष्ट तेव्हढीच सत्य आहे की आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या आधुनिक आणि वेगवान जगात स्वतःचा यशाचा मार्ग हा मदतीला धरून नाही तर मदतीला अनुसरून पार केला जातो. स्त्रिया समोर जाताय, आपल्या यशाचा नवा उच्चअंक गाठताय आणि त्या गाठलेल्या यशासोबत त्या आपल्या कुटुंबालाही सामान महत्व देताय हे तेवढंच महत्वाच. एक सशक्त स्त्री फक्त एका कुटुंबालाच सुशिक्षित करत नाही तर ते आदर्श बनते ती राहत असलेल्या कॉलनी साठी, ती उदाहरणं बनते बाळगत असलेल्या समाजासाठी, ती प्रेरणा बनते तिच्या संपूर्ण देशासाठी आणि ती हिम्मत बनते तिच्यासारख्या अडचणीत असलेल्या कित्तेक स्त्रियांसाठी. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच अस्तित्व हे फक्त बुद्धीने नाही तर हिंमतीने आणि ताकदीने जगवलंच पाहिजे.


Rate this content
Log in

More marathi story from Gaurav Daware