sumedh sonawane

Children Stories

4.3  

sumedh sonawane

Children Stories

शाळेचा पहिला दिवस आणि काठीचा मार!

शाळेचा पहिला दिवस आणि काठीचा मार!

3 mins
65


शाळेचा पहिला दिवस आणि काठीचा मार!

नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊन दहावीत गेलेलो. बघता बघता सुट्ट्या संपल्या आणि शाळेचा पहिला दिवस उजाडला! 

शाळा भरली. 

साधारण २००१ सालाची बात आहे. 

मी तसा अंगाने लठ्ठ!

डोक्याने मठ्ठ!

आणि मैत्रीने पहिल्यापासून घट्ट होतो!

 एरवी कधी खोड्या मस्ती न करणारा शांत मुलगा मी!!! अचानक त्या दिवशी काय माझ्या अंगात वार भरलं कुणास ठाऊक! 

मी आणि माझा मित्र भरत जाधव (सिनेमातला नव्हे)!

बेंच वर उभे राहून धिंगाणा करू लागतो! 

इकडून उडी तिकडे!

तिकडून उडी इकडे!

माझं वजन आणि तोल सांभाळत माझी उत्तम कसरत चालू होती!!!

 वर्गात सुद्धा धांगडधिंगा सुरूच होता कारण अजून आमच्या वर्ग शिक्षिका वर्गात आल्या नव्हत्या!!!!

बरं... इकडे माझा आणि भरतचा धिंगाणा चांगलाच रंगात आलेला असताना अचानक आमच्या रंगात भंग पडला!

मी आणि भरत माझ्या वर्गातल्या एका मुलीच्या अंगावर बदकन पडलो! 

अर्थात चुकून!!! 

तीच नावं अमिता स्वभावानं खूप शांत आणि डोळ्यांवर सतत चष्मा! 

आता मी तेंव्हा सुद्धा जवळ जवळ ८० किलोचा! (आई शप्पत)!!! आणि भरत साधारण ५० किलोच्या आसपास!!!

शाळेचा पहिला दिवस सर्व विद्यार्थी पहिल्या तासाची घंटा वाजण्याच्या प्रतिक्षेत असतानाच इकडे अमिताची हाडं वाजली होती कडकडून!!!

भयाण शांतता!!!

तीने हुंदके देत रडायला सुरुवात केली!

आणि आम्ही तिला विनवण्या करायला सुरूवात! 

प्लिज जाऊदे...आम्हाला माफ कर!

सॉरी! सॉरी! सॉरी!


पण नाकाम... ती तडक उठली आणि वर्गाच्या बाहेर गेली..... अर्थात बाईंना सांगायला हे न कळण्या इकते आम्ही सुद्धा काही लहान नव्हतो..!!!

दहावीत होतो आम्ही दहावीत!!!

कपाळ!!!

इकडे वर्गात सर्वांची कुजबुज सुरू झाली! आता हे दोघे गेले कर्माने!

आम्ही दोघे तडक आपल्या जागेवर मान खाली घालून बसलो. 

आणि माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं!!!

काय बोलतील मॅडम? मारतील? ओरडतील? शाळेतून काढून टाकतील? 

ना ना विचार येऊ लागले!

आणि तेवढ्यात मॅडम आणि ती मुलगी वर्गात हजर!!!

वर्गात एकसुरात आवाज घुमला.... 

एक साथ नमस्ते बाई!!! 

तसा मी भानावर आलो!!!


बाईंचा चेहरा रागाने लाल.... हातात जवळ जवळ ४ फूट लांब जाडी काठी!!!!

बापरे! एवढी मोठी काठी कुठून आणली बाईंनी मला प्रश्न पडला!!! 

खास आम्हाला बदडायला शोधली असणार!!!

तेवढ्यात बाई गरजल्या सोनावणे आणि जाधव बाहेर या जागेवरून!

आणि आम्ही एखाद्या गरीब वासरा सारखे दबकत दबकत जवळ गेलो. 

आणि आम्ही सॉरी बोलायच्या आत बाई मशीन गन सारख्या ज्या सुरू झाल्या की बोलता सोय नाय!!!

आई!!!वुई!!!बाबो!!!मेलो!!! करत आमची लावणी सुरू झाली...

आणि सर्व मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी   बिन पैशाचा तमाशा बघायला मिळाला!!!

बाई शांत झाल्या बहुदा दमल्या म्हणून!!!

आणि सूचना वजा धमकी देऊन गेल्या उद्या पालकांना घेऊन या!!!

आम्ही जागेवर येऊन बसलो.

चेहरे रडके, केविलवाणी!

शाळा सुटली.... 

दुसऱ्या दिवशी दोघांचे पालक भेटून गेले. बाईंना पण आम्हाला जरा जास्त मारल्याच दुःख वाटलं! पुन्हा सगळं पहिल्या सारखं झालं!

बघता बघता निरोप समारंभ आला! 

एक मेकांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या! 

सर्व शिक्षकांचे/स्टाफ चे आशीर्वाद घेतले गेले!!!

आणि कधी एकदा या शाळेतून सुटतोय अस झालं!!!

शाळा तर सुटली कायमची! पण आठवणी काही सुटल्या नाही!!!


आता रोज आठवते ती शाळा!

ते मित्र!

मधली सुट्टी!

बाई! गुरुजी!

अभ्यास! 

एक मेकांना भरवलेला घास!

बेधुंद केलेली मस्ती!!!


शाळेने बरंच काही शिकवलं!

ज्या काठीला आपण इतकं घाबरत होतो तीच काठी आपल्याला म्हातारपणी आधार देते उभं राहण्यासाठी!

शिक्षक आपल्याला मारत नाही ते आपल्याला घडवत असतात काठीच्या आधारे!!!

आज जवळ जवळ वीस वर्षे झाली या गोष्टीला! 

कधी आठवलं की डोळे पाणावले जातात! 

बरेच मित्र मैत्रिणी आजही संपर्कात आहेत. बोलणं/ चालणं/ भेटणं/ भांडण/ होत असतं वरच्यावर!!! 

सर्व आपल्या संसारात सुखी आहेत!!

एकदा दोनदा अचानक बाईंची सुद्धा भेट झाली... आणि त्यांनी मला मारलेली ती हाक.... सोनावणे! 

किती प्रेम होतं त्या आवाजात!!!!

या लॉकडाऊनमुळे आज घरात बंदीस्त झालोय!!!

म्हणे देश वीस वर्षे मागे गेलाय!          

म्हणून विचार करतोय पुन्हा एकदा शाळेत जाऊन मोकळा श्वास घेऊन येऊ म्हणतोय!

आणि

काठीच्या तालावर कोरोनाला धडा शिकवू म्हणतोय!


Rate this content
Log in