STORYMIRROR

Vijay bhadane

Others

2  

Vijay bhadane

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
111

समुद्रवीणा छेडित चंद्रा

उधळ निळ्या लहरी।

अमृत खेचूनि आणू भूवरी

दडले जे जहरी वातावरणी।।


     कवी बा भ बोरकरांना अभिप्रेत असलेले हरित निसर्गरम्य निरामय सुंदर शुद्ध असे वातावरण पृथ्वीतलावर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्न केले पाहिजे. ध्वनी, प्रकाश,वायू,जल अशा सर्वप्रकारच्या प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पृथ्वीतलाववर जीवन संकटात सापडले आहे.ऋतुचक्राचा समतोल हा केवळ सर्वत्र प्रदूषणाची पातळी वाढल्याने बिघडला आहे हवामानातील बदलाने अतिवृष्टी, अवर्षण, अवकाळी, चक्रीवादळे, भुकंप, महापूर, साथीचे रोग अशी संकट मालिका सुरू आहे.त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होउन जीवित हानी होत असल्याचे आढळून येत आहे.


मन हरखून टाकणाऱ्या निसर्ग संपदेचा, गर्द हिरवाईचा बळी विकासाने घेतला आहे.सुधारणा,विकास,प्रगती,संशोधनाच्या नावाखाली पर्वत डोंगर, टेकड्या, पठारे, दरी खोरी, जंगल अरण्य,वने उपवने, विहिर, तलाव,सरोवरे या निसर्ग रचनेला बाधा पोहोचून निळे मोकळे गगन,प्रदूषित होत असते. वृक्षराजीचा बेलगाम विध्वंस झाल्याने तापमानात वाढ होते,वन्य प्राणी,पशु,पक्षी बेघर होऊन जीवाला मुकतात. निळे जांभळं डोंगरमनोरे,घनदाट जंगले, सरीतासागर,निर्झर,तलाव पाणथळ जागा, प्राणी सृष्टी असा संपन्न निसर्ग पर्यावरणाचा आधार आहे.सर्व प्रकारचे प्रदूषण टाळून शुद्ध पर्यावरणाचे व्रत स्वीकारणे व आपली बहुरत्ना वसुंधरा वाचविणे हाच खरा मानव धर्म आहे,त्यासाठी झाडे लावा झाडे वाढवा झाडे वाचवा हा मूलमंत्र प्रत्येकाने जपण्याचा व कृतीशीलतेने अंमलात आणण्याचा निर्धार आज पर्यावरण दिनी प्रत्येकाने केला पाहिजे !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Vijay bhadane