raut rekha

Others

4.0  

raut rekha

Others

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण संरक्षण

2 mins
258


खवळलेला समुद्र मी

आता शांत झालोय.

गर्दीत हरवलो होतो

एकांतात तर

सापडलोय.


ही गोष्ट  जंगल सफारीवर गेलेल्या एका वीस वर्ष्याच्या तरुणाची. मादो उर्फ महादेव जगदीश पाणीपुरे विशीतला देखणा, उंचपुरा, धिप्पाड छातीचा, क्षितिजाला टेकलेल्या उंच -उंच डोंगर रागात बघाव्या. ट्रेकिंग करावी, भटकंती करावी कधी नाल्या -धोंड्यातून तर कधी नदीच्या किनारी, समुद्राच्या रेतीवर, करवंदाच्या बागेतून, खुळ्या आमराईतून, पानथडीवर, फुलांच्या पटारावर, हिरव्या माळावर खुल्या आसमानात विहार करायला कुण्या तरुण मनास आवडणार नाही. हे वयच असं असतं अगदी. मोहरून आलेला केवडा जणू... कि..उगवलेली कळी जणू... नाही का उमदया रक्ताचा, संकटात बल आणि बुद्धी वापरून काम करणारा एक तरुण. खरं तर कवी मनाचा पोरगा. हिरवळ न्याहाळावी. माणसांची गर्दी बघावी. समुद्राच्या लाटांवर गटांगळ्या खाव्या. आंब्याच्या बागा दिमाखात साठवाव्या जंगलाचं सौदर्य पहावं.... अगदी काय तर _चटणीत घाल पाणी, तेल नसेल तर संकटांशी लढणं शिक, जगायचं असेल तर. हा जो संदेश आहे त्याच्या वागण्यातून दिसून येतो. माही, लता, जगिरा, उल्हास,सुबोध, समई आणि आपला मादो हे सगळे फिरस्ते. आज एमपी जंगल spot त्यांनी फिरायसाठी निवडला. हे काय आहे तर जगाला शेवटच्या श्वासापर्यंत डोळभरून पाहून घ्यावं हे वेड. आणि वेड असल्याशिवाय माणूस यशाचं शिखर ही गाठू शकत नाही.

 

  जंगलात खुप सारे प्राणी असणार नाही का. हरणं -तरस, वाघ, हत्ती, किडा -मुंगी आणि काय काय....... ये माही आपण जंगलात गेल्यावर मस्त झाडावर चडू म्हणून बेत केलेला जगिरा लागलीच जंगलाच्या ओढीनं चालू लागला. याला पक्ष्यांचे आवाज काढण्याचा नादच.... कुठलाही नवीन पक्षी किलबिलला कि हा तो आवाज ऐकायचा, काढून बघायचा. हाफ काळा पेंट, स्काय ब्लु टी -शर्ट आणि पाठीवर एक बॅग व डोक्यावर टोपी. अशा अवतारात हा मॅन ऑफ वाइल्ड life सारखा दिसायला गोरा देखणा भारी दिसतोय. माही हलक्या गुलाबी रंगाच्या फुलांफुलाच्या स्कर्ट वर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलाय त्यात ही बया एकदम गोरीगोरी पान फुलासारखी छान म्हणून खुलून दिसतेय. लता नावाप्रमानं लाजरी आणि साजरी आहे तीच ते साखरच्या पाकासारखं निर्मळ बोलणं आणि केवढ्याची कांती असलेली लता नं आज लाल रंगाचा चुडीदार घातलेला आहे त्यावर व हलक्या बेंगणी रंगाची ओढणी वर तिची नाजूक काया भारी उढून दिसतेय.सुबोध ने पण मस्त साऊथ फेशन हिरवा -काळा -निळा डब्या डब्याचा चा शर्ट व ब्लॅक रंगाचा जीन्स परिधान केलाय अगदी निसर्गाशी मिळता जुळता पोशाखात तो एकदम प्रोफेशनल फिरस्ती वाटून राहिलाय;आणि हा सुबोध थोडा बोध आहे पण साधा आहे त्याच्या मनात कुठलंच कपट नाही. त्याने मस्त ब्लु जीन्स आणि फेंट पिंक रंगाच शर्ट घातलंय पाठीवर बॅग व हातात कॅमेरा घेऊन वारी पुढं -पुढं चाललीय.समई ने मस्त जीन्स घातलाय पांढऱ्या रंगाचा व येलो टॉप वर एकदम शहर कि लडकी वाटतेय ती. ही आपली हिरोईन आहे. आणि आपला हिरो मादो उर्फ महादेव चालतोय आपला ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जीन्स घालून अगदी सुंदर डोंगर आहे आणि पायथ्याशी असणाऱ्या पायावाटेनं सफरनामा सुरु झालेला आहे.... समोर काही अंतरावर असणाऱ्या नदीकाठी जी जंगलाच्या अगदी मधात आहे. तिथं आज रात्रीचा मुक्काम ठरवून सगळे रमत -गमत निघाले.....✍️


Rate this content
Log in