प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन
७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
भारताला ब्रिटिश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. बरेचसे विचार-विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसांनंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने 26 जानेवारीला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' हा साजरा करण्यात येऊ लागला.
