मन एक लेखणी साहित्यिक समुह

Children Stories

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Children Stories

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

1 min
158


२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. म्हणून भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरेच लोक ह्याला बँक हॉलिडे, वाह! सुट्टीचा दिवस अशा सोयीस्कर नावांनी सुद्धा ओळखतात. 

ह्या दिवसाचं नक्की महत्व काय आणि हा स्वातंत्र्य दिनापेक्षा वेगळा कसा? हा बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न आहे. 

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात सत्ता कशी स्थापन करायची? इथपासून ते येथील नागरिकांना काय अधिकार दिले जातील? इथपर्यंत सगळ्याच गोष्टी संविधानाअंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक मांडायला सुरवात केली आणि अखेरीस २६ जानेवारी १९४९ रोजी हे संविधान देशभरात लागू केले गेले. प्रजेची सत्ता स्थापन करण्यासाठी अधिकार देणाऱ्या ह्या दिवसाला प्रजासत्ताक म्हणून संबोधलं जात. 

आपल्याला आपले मत मांडण्या पासून ते आपल्या संस्कृती, धर्म, परंपरा, सण, वार ह्यांचे जतन आणि साजरीकरण करण्याचे; ते बदलणे किंवा सर्वत्र प्रचार करण्याचे आणि आपले घर, मालमत्ता विकत घेण्यापासून ते देशभरात विना अटकाव प्रवास करण्याचे असे सगळ्या प्रकारचे हक्क आणि स्वातंत्र्य ह्या प्रजासत्ताक साविंधानाने आपल्याला दिले आहेत  

तेव्हा सुटी साजरी करता करता आपल्या ह्या देशाबद्दल कृतदन्यता आपल्या वागण्यात दिसावी ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न. 


Rate this content
Log in