मैत्री असावी कशी
मैत्री असावी कशी
आज कलियुग म्हणता मैत्री नावाची व्याख्या बदलत चाललेली दिसत आहे. कारण कोणीही मैत्री फक्त स्वार्थापुरती करतो मग एखाद्याकडे पैसा,संपत्ती किंवा प्रतिष्ठा ओळख आहे. म्हणून लोक मैत्री करताना त्याच्या मागेपुढे फिरताना पाहायला मिळतात. परंतु जसजसं तो अधोगतीला जातो किंवा त्याच्याकडची संपत्ती निघून जाते त्या वेळेला त्याचा साथ सोडणारे बरेच समाजात पाहायला मिळतात. ही झाली स्वार्थी मैत्री एक उदाहरण म्हणून द्यायचं झाल्यास श्रीकृष्ण सुदामाची मैत्री सुदामा जरी मूठभर चण्यासाठी खोटं बोलला आणि कृष्णाला थोडे बहुत चने न देता स्वतःच फस्त केले. त्यामध्ये पण दुजा भाव होता म्हणायला हरकत नाही. कारण त्याचं पोट भरणार आणि भरून उरेल त्यावेळेस तू कृष्णाचा सहायता करेल. परंतु तसं त्यांनी केलं नाही कारण त्याला स्वतःलाच तेवढे कमी पडत होते. असो पण कृष्णाने त्याची परिस्थिती जाणली ज्या वेळेला तो महालामध्ये भेटायला आला दरिद्री ब्राह्मण म्हणून त्यावेळेस चिमूटभर पोह्याच्या बदल्यात त्याला सोन्याचं नगर बसवून दिलं. मैत्री अशी असावी जो संकटात किंवा समोरच्या व्यक्तीला काय मदत लागणार त्या आधीच त्याचे काम पूर्ण करणार. म्हणजेच त्याला माहित पण पडणार नाही. याला म्हणता येईल मैत्री. कृष्ण अर्जुना मध्ये होती दुर्योधन कर्णामध्ये होती. अशी जीवाभावाची मैत्री आता पहावयास मिळत नाही.
