कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस; सल्ला डॉक्टरांचाच घ्या. कोरोना व्हायरसने जग धास्तावले असून आम्ही आजही त्याची भीती बाळगून आहोत. कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाही व काळजी घेत असतांनाही कोरोनाच्या रुग्नसंख्येत वाढ होतांना दिसत आहे.परिस्थिती विचित्र स्वरुपाची असून खरंच कोरोना मानवासाठी घातक आहे. कोरोनाची व्याप्ती पाहता कोरोनाची लागण बहुतःश सर्व जगात झालेली असून काही देश व्यवस्थीत काळजी घेत असून त्या देशात तो विषाणू आटोक्यात आला आहे.त्यासाठी तेथील देशही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत.भारत सध्या तरी याबाबतीत आघाडीवर आहे. कोरोनावर उपचार सांगतांना कोणी वेगवेगळे उपाय सांगत आहेत.कोणी दारु प्यायला सांगत आहेत. कोणी गाईचं गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोना होत नाही म्हणतात.तर कोणी कापडात कापूर,लवंग याची पुळचूंडी बांधायला लावतात.तर कोणी गरम पाण्याच्या गुळण्याही टाकायला लावतात.कोणी प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी असे सांगतात.त्यासाठी आंबट पदार्थ खायला लावतात.
खरंच असे उपाय केल्यानं लोकांमध्ये फालतूचा संभ्रम निर्माण होत आहे.जो तो आपआपले वेगवेगळे उपाय करण्यात मग्न आहेत.तसंही पाहता आपला देश हा मेंढ्यांचं अनुकरण करणारा देश आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.कारण आपण स्वतः आपल्या मनाने विचार न करता बाजूचा काय करीत असतो,ते पाहात असतो.त्यानुसार वागत असतो.तसेच भीतीमुळे जो माणूस जेही खायला असेल,तेही खायला आपण बाध्य होतो.मग ती वस्तू योग्य असो की नको.यात विचार करीत नाही.पण यात विचार केलेला बरा.यात विचार असा की ज्या वस्तू पचवायची बाजुच्या माणसाची प्रतिकारशक्ती चांगली असेल,तीच वस्तू पचवायची प्रतिकारशक्ती दुस-या माणसाची असू शकते असे नाही.समजा एखाद्या गाईच्या गोठ्यात राहणारा,गाईची अहोरात्र सेवा करणारा व्यक्ती जर गाईचं गोमुत्र पित असेल तर साहजिक आहे.कारण त्या गोमुत्रातील जंतूंना त्याच्या शरीराची सवय आहे.पण तेच गोमुत्र एका शहराच्या माणसानं जर प्राशन केलं.तर त्याला अपाय होवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण ते गोमुत्र शुुद्ध केलेलं नसतं.
अलिकडे आम्हाला रुमाल बांधलेले दिसतात.पण खरंंच रुमाल शुद्ध स्वरुपाची असते का?आपण ज्या भागातून रुमाल बांधतो.तीच बाजू परत बांंधताना वापरतो का?तसेेच त्या रुमालाने नाक,कान तरी झाकलेे असते का?ती जर दुस-या बाजूनं वापरली गेली तर त्या रुमालाचे जंतू शरीरात प्रवेश करणार नाहीत का? महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्याला सहज शंका येत असेल,कोरोना झालाय.त्यांनी कोणीही कोणतेही उपाय सांगीतलेले पाळू नये.घरी साबनाने हातपाय धुऊन घ्यावे किंवा गरम पाण्याने हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करावा.रुमाल वापरण्याऐवजी हाताने शिवलेला मास्क वापरावा.कोणीही कोणतेही उपाय न करता त्यांनी आपल्या मताने विचार करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.भोंदूबाबांकडे कोणीही जावू नये.कोणी कोणतेही उपचार सांगीतलेले ऐकू नयेे.कारण जर का असे उपाय केल्याने समस्या आलीच किंवा निर्माण झालीच तर तो कोरोना होण्यापुर्वीच निघून जाईल. मग त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. ;चांगलं ते घ्या.वाईट सोडून द्या.
सगळीकडं क
ोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ती संख्या काही कमी व्हायला तयार नाही.सगळीकडे लॉक डाऊनचे वारे आहेत. सरकारनं या कोरोना व्हायरस वर विजय मिळविण्यासाठी नाकाबंदी करुन लोकांना घरातच राहा असा सल्ला दिलेला आहे.त्यानुसार समजदार मंडळी आजही घरातून बाहेर पडत नाहीत.काही जण पडतात. मुलांना सुट्या दिल्या शाळेला की जेणेकरून या कोरोनाचा पादुर्भाव विद्यार्थी वर्गाला होवू नये.त्यांनी घरातच राहावे व रोग आटोक्यात यावा.पण ह्या मुलांचे निरीक्षण केल्यास असे आढळून येते की ही मुले घराकडील मैदानावर गर्दी करीत खेळतात.कोरोना पसरणार नाही का? आजही किराणा दुकान सुरु असून तिथंही गर्दी होते.तसेच आजही चक्क्या चालू असून तिथंही तोच प्रकार.काही जणांनी चक्क व्यवहार करण्यासाठी पोलिस स्टेशनमधून पासा बनवल्या.तसेच ते व्यवहारही करीत असून कोरोना पसरवीत आहेत.पण गरीबांचं काय? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. गरीब मंडळी मात्र नाईलाजाने आपल्या घरात निपचीत बसली आहेत.ते जास्त करून बाहेर निघत नाहीत.कारण बाहेर निघाल्यास पोलिसांचा मार बसत आहे. महत्वाचं म्हणजे सरकार काही मुर्ख नाही की कोरोनाच्या या साथीत देशात लॉकडाऊन करतं.जर लॉकडाऊन केलं नसतं,तर आज जी देशात रुग्नांची संख्या दिसते ना.त्या संख्येत कितीतरी पटीनं वाढ झाली असती.आज प्रत्येक घरातील एक व्यक्ती स्मशानात दिसला असता.कोरोनाला रोखता आलं नसतं.कारण देशात तेवढ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधासाठी देशात सोयी नाहीत. कोरोना आपल्या जागी आहे.पण त्या कोरोनावर किती मते मतांतरे आहेत.कोणी मोदी साहेबांना दोष देत कोरोना नाही असं सांगतात.ही अफवा आहे असं म्हणतात.मग ही जर अफवा आहे तर इतर देशातील लोकं का मूर्ख आहेत की ते काळजी घ्यायला सांगत आहेत.अन् आपण काय एवढे शहाणे आहोत की आपण कोरोनाला मानत नाही.पण मित्रांनो तसं करु नका.कोरोना हा गंभीर आजार असून तुम्हाला त्या आजाराला स्विकारावंच लागेल.त्यानुसार पावलं उचलावी लागतील. मित्रांनो निदान आपल्यापेक्षा गरीब असलेल्या त्या मजूरांकडे पाहा.ज्यांच्या घरी एक दिवस जरी ते कामाला नाही गेले तर चूल पेटत नाही.ते कसे जगत असतील बरे! कारण कोरोना महामारी आहे.आम्हाला कसंही करुन मारायला.आजारावर आम्ही मात करता करता आम्ही उपासानं मरु अशी भीती आम्हाला वाटते.पण उपासानं किती मरणार. दोन चार.......पण जर का आपण हा दोन चार दिवसाचा उपास सहन केला नाही तर किती मरतील याचा आपल्याला अंदाज नाही.म्हणून कोरोनाबाबतीत सांगायचं झाल्यास चांगले ते घ्या.वाईट सोडून द्यावे. लोकांमध्ये कितीही संभ्रम असले,लोकं कितीही अफवा पसरवीत असले तरी अफवावर विश्वास ठेवू नका.हे बघा राम आणि रावण एकाच राशीची माणसं.पण रामाचं कार्य चांगलं भारतात.तोच रावण दुराचारी.निव्वळ कर्मानं त्यांचं नशीब घडलं.आपलेही कर्म चांगले ठेवा.कारण आता संधी आहे.घरातून बाहेर पडू नका.काळजी घ्या.अफवांवर विश्वास ठेवू नका.नाहीतर एक इतिहास बनेल.सण दोनहजार वीस मध्ये एवढे मरण पावले होते. मग आपली येणारी पीढी, आपण जर काळजी न घेता वागलो तर ती आपल्यालाच दोष देईल. असं होवू नये म्हणून नाण्याला जरी दोन बाजू असल्या तरी तुम्ही चांगली बाजू घ्यावी.वाईट तेवढं सोडून द्यावं.मग कोरोनावर कितीही अफवांचा पाऊस पडत असला तरी........