कोकीळ आणि ससाणा
कोकीळ आणि ससाणा
1 min
120
एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता त्याला एक कोकीळ सापडला. तो कोकीळ त्याला म्हणाला, ' भाऊ, मला सोड मी इतका लहान आहे की मला खाल्याने तुझं पोट नक्कीच भरणार नाही, मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल.'
ससाणा म्हणाला, 'तू कितीही लहान असला तरी माझ्यासारख्या भुकेलेल्या प्राण्याला तुझ्या मांसाचा बराच उपयोग होईल. शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्या इतका मी नक्कीच मुर्ख नाही.'
तात्पर्य - हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे हा मूर्खपणा होय.
