हरवलेली डायरी नि तिच्यातून हरवलेली ती ...
हरवलेली डायरी नि तिच्यातून हरवलेली ती ...
पहाटेची पक्षाची किलबिल सुरू होती.त्याच्या त्या आवाजात तिला जाग आली.आणि तिनं पटकन उठून आपलं आवरलं. तितक्यात नवरा हा कामावर जाण्यासाठी तयार होऊन आला. तिने त्याच्या पुढ्यात चहा टेकवला तो चहा पिऊन निघून गेला. तिने मुलाला उठवलं. आणि त्याच आवरून शाळेत पाठवलं. सगळं घरातल काम लवकर लवकर संपवलं नि पटकन आपल्या रूम कडे वळून कपाट उघडलं.त्यात काही तरी शोधण्याची तिची धडपड सुरूच होती.पण तिला ती वस्तू लवकर सापडत नव्हती. म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली. तिच्या डोक्यात विचार येऊ लागले कुठे गेली कोणी फेकली तर नसेल ना? कोणी बघितली तर नसेल ना ?किती जपलं आपण तिला ?मी कुठे चुकीच्या जागेवर ठेवली तर नव्हती ना ? अनेक प्रश्न तिच्या मनात घोळ करत होते.मग तिनं न राहून सगळं घर आवरायचं ठरवलं. पण परत विचार आला.मध्येच नवरा किंवा मुलगा आला तर आपल्याला मूर्ख समजतील. असं अचानक कसं आज सुचलं हिला? ते पण घर आवरायचं म्हणून तिने उद्या वर घर आवरायचं काम ढकललं.आणि दुसऱ्या कामात गुंतण्याचा प्रयत्न करू लागली. पण तीच मन काही रमेना तितक्यात घड्याळाचा काटा आणि दाराची बेल एकदम वाजली. मग तिने दार उघडलं मुलाला आणि नवऱ्याला जेवण बनवलं.पण स्वयंपाक करतांना तीच लक्ष लागत नव्हतं. नि कोणाला सांगता ,विचारता पण येत नव्हतं. मग तिने त्या दोघांना जेवून झोपायला सांगितलं. परत ती गेलं कुठे असेल. या विचारात गुंतली नि विचार करता करताच थकलेली असल्याने झोपली.दुसऱ्या सकाळी परत तेच सगळं काम आवरून मुलगा शाळेत पाठवून नवरा ऑफिस ला पाठवून. लगेचच सगळं घर आवरायला सुरुवात केली. पण वस्तू काही सापडेना मग तिने कपाटातील सगळ्या साड्या भराभरा खाली टाकल्या. नि तिला साडी खाली टाकताना आवाज आला. काहीतरी पडण्याचा तिने पटकन ती डायरी कुठे पडली ते बघून उचलली. नि तिच्या डोळ्याचे काट थोडे ओले झाले होते. चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आनंद अश्रूंनी तिने ती उघडली. त्यात पहिलं पानं शाळेतील आठवणीनी भरलेलं होत ते वाचून ती परत त्या जगात हरवली शाळेतील ती मस्ती, मज्जा मस्ती ,मित्रमैत्रिणी, दुसऱ्यांवर मारलेले जोक्स, मित्रमैत्रिणीचे वाढदिवस, भोले की वह पान टपरी ,चाचू की वहं चाय, जिमी की वहं भूत वाले pic , मराठी हिंदी मिक्स बोलणं पेपर सुरू असतांना खोकून व ईशारा करून उत्तर सांगणं.शाळा सुटली की कैरी,चिंच तोडून मार नेहमी गण्याला पडणं नि सगळयांनी लपून बसणं. हे सगळं तिला आठवतं होतं.तितक्यात तीच लक्षखालच्या कोपऱ्यात गेलं नि तिथे लिहिलेले वाक्य परत ती वाचू लागली. शाळा सुटल्यावर भेट सांगते तुला , सर आल्यावर गोळा फेक, वर्गात आलेलं झुरळं नि सगळ्या मुलींची हकलपट्टी ,यासारख्या अनेक आठवणी तिला ताज्या झाल्या.आणि मनाला वाटलं अरे नक्की आपणचं होतो का हे उद्योग करणारे ? आपण इतकं शांत कसं झालो अनेक विचार तिला येऊ लागले. पिंकी कुठे असेल ,चिऊ ला माझी आठवण येत असेल का ? अमर आणि समीर ने केलेली ती धमाल यविचारातून सावरून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. पण ते काही होत नव्हतं.खरंच किती आयुष्य बदललं आपलं ? नाही मित्रमैत्रिणी भेटत ना भेटून पण तीच शाळा तोच बाक मिळेल का बरं परत मला? तोच चहा तेच शिपाई काका तीच नंदा मावशी कुठे असेल ?ते सगळे कसे असेल ? या सगळ्या आठवणी संपता संपत नव्हत्या. तिने संपूर्ण डायरीची सगळे पान वाचत.आठवणी ताज्या करत गेली. वाचता वाचता शेवटचं पान ही डायरीला आहे आणि ते इतका लवकर येणार आहे. हेच ती विसरून गेली.नि त्या शेवटच्या पानांवर बदललेलं जीवन म्हणून तिने पुन्हा नव्याने हरवलेल्या डायरीला सुरुवात केली.पण पान बदललेल होत.
