चिंटूची परीक्षा
चिंटूची परीक्षा
चिंटूची परीक्षा जवळ आलेली असते. शाळेतून तो घरी येताच आई लगेच म्हणते, "चिंटू जास्त वेळ खेळू नकोस. आता अभ्यास केला पाहिजे".चिंटू फारसं बोलणं मनावर घेत नाही.तो त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गाड्या काढून खेळू लागतो.गादीवर लोळू लागतो.
परीक्षेचा दिवस असतो.चिंटू शाळेत जायला निघतो.आई विचारते,"सगळं घेतलंस ना बरोबर."
चिंटू बाकावर जाऊन बसतो..समोर येतो परीक्षेचा पेपर.पहिला प्रश्न वाचतो काहीच कळत नाही. दुसरा प्रश्न पण अनोळखी असतो.. असं करत सगळे प्रश्न वाचले तरी एकाचही उत्तर येत नाही. चिंटू खूप घाबरतो, रडवेला होतो आणि जोर जोरात ओरडायला लागतो "मला काहीच येत नाही. मला काहीच येत नाही."
तेवढ्यात आईचा आवाज येतो "अरे झोपेत किती बोलतोयस. स्वप्न पडलं वाटतं". मग चिंटूच्या लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं.चिंटू ठरवतो की आपण व्यवस्थित अभ्यास करायचा म्हणजे आपली अशी फजिती होणार नाही.
