भविष्य
भविष्य
1 min
169
उगाच भविष्यात रमण्यापेक्षा
वर्तमानात जगून पाहू
कोणाकडे मागण्यापेक्षा
कधी कुणाला देऊन पाहू
लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा
स्वतःच्या आत डोकावून पाहू
इतरावर विश्वास ठेवण्यापेक्षा
आपल्यावर विश्वास ठेवून पाहू
हरल्यावर सतत रडण्यापेक्षा
जिंकण्याची आस धरून पाहू
'नाही जमणार' म्हणण्यापेक्षा
एकदा प्रयत्न करून पाहू
दुसऱ्याच्या मनातले ओळखण्यापेक्षा
स्वतःच्या मनातले जाणून पाहू
सगळं चांगलंच होणार आहे
आपण सुरूवात करून पाहू
